Ferfar In Marathi: फेरफार म्हणजे काय? फेरफारातील नोंदी चुकल्यास दुरूस्ती कशी करावी जाणून घ्या!

Ferfar Land Records Guide Marathi

Posted on: 26 December 2025 | Category: Land Records / Blog

शेतजमीन असो किंवा बिगरशेतजमीन प्रत्येक जमिनीची नोंद ही शासकीय दफ्तरी झालेली असते, हा खूप आधिपासूनचा शासकीय नियम आहे. यानुसार ज्या व्यक्तीच्या नावावर ती जमीन आहे त्या व्यक्तीची माहिती आणि जमिनीची माहिती नोंदीमध्ये देण्यात आलेली असते, ही जमिनीसंबंधीत नोंद अत्यंत महत्त्वाची असते कारण जमीनीचा हक्क सिद्ध करण्यासाठी फेरफाराचे पुरावे कोर्टात मान्य करण्यात येतात. अनेकदा यावरुन ग्रामिण भागात विवाद होताना दिसून येतात. चला तर मग या फेरफार संबंधित अधिक माहिती मिळवूया आणि फेरफारातील चुकीच्या नोंदी दुरुस्त कशा करायच्या हे देखील जाणून घेऊया.

फेरफार म्हणजे काय?

प्रत्येक जमिनी संबंधीत नोंद करण्यासाठी गावाच्या शासकीय कार्यालयात एक नोंदवही असते. फेरफार म्हणजे गाव नमुना 1 ते 21 यांमधील गाव नमुना नं. 6 मधील नोंदी म्हणजेच हक्क संपादनाचे पत्रक व फेरफार नोंदवही. यात जमिनीचे सर्व फेरफार, व्यवहार, खरेदी विक्री, वारस तारीख, खरेदी रकमा संबंधित माहिती असते जी नोंदवहीमध्ये ठेवलेली असते. यालाच फेरफार नोंदवही असे म्हणतात. या फेरफार नोंदवहीवरील नोंदीच पुढे 7/12 वर येतात. तसेच सातबाऱ्यावर कोणतीही नोंद करण्यापूर्वी ती फेरफार नोंदवहीत नोंदवणे गरजेचे असते.

सातबाऱ्यावर येणाऱ्या नोंदी

सातबाऱ्यावर कोणतीही नोंद करण्यापूर्वी त्या बाबीची नोंद फेरफार नोंदवहीत करणे गरजेचे असते. यालाच गाव नमुना क्र. 6 फेरफाराची नोंदवही किंवा गाव नमुने नं. ‘ड’ असेही म्हटले जाते.

गाव नमुना नं. 6 चे किंवा फेरफाराचे प्रकार

फेरफार नोंदीतील चुकांची दुरुस्ती

फेरफार नोंदवहीमध्ये झालेल्या चुकीच्या नोंदी या तशाच पुढे सातबारामध्ये नोंद केल्या जातात त्यामुळे फेरफार नोंदवहीमध्ये सुरवातीलाच योग्य नोंदी होणे गरजेचे असते. कारण चुकीच्या नोंदी दुरूस्त करण्याची वेगळी प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया आपण समजून घेऊ.

अनेकदा फेरफार वहीमध्ये नावाच्या चुका हमखास होतात. एखादा गट नंबर वगळला जातो किंवा व्यक्तीचे नाते किंवा नाव चुकीचे लिहिले जाते. अशा वेळी महसूल खात्याने नव्याने नोंद घेण्याची आवश्यकता नसते. लेखन प्रमादानातील चूक दुरुस्त करतेवेळी खातेदाराने थेट संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करणे नियमबद्ध आहे.

व्यक्तीच्या हक्काबाबत फेरफारात झालेल्या चुका व त्याची दुरुस्ती

जमिनीच्या मालकी हक्क, कुल, वारसा, उत्तराधिकारी इत्यादी हक्कांमध्ये आपल्याला स्थान देण्यात आले नाही असे वाटणाऱ्या व्यक्तीला योग्य त्या पुराव्याच्या आधारे आपणास सादर बाबत हक्क आहे. यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेरफार नोंदी विरुद्ध न्यायालयात अपील किंवा फेर तपासणीसाठी अर्ज दाखल केला पाहिजे.

जमीन व्यवहारा संदर्भात फेरफारमध्ये झालेल्या चुका व त्याची दुरुस्ती

फेरफार नोंदवहीमध्ये याआधी झालेल्या नोंदीमध्ये दुरुस्ती संबंधी नोंदणी दुबार होणे अशी अपील करावी लागते. असा अर्ज केल्यानंतर पुन्हा एकदा जमिनीची तपासणी केली जाते आणि त्यानंतरच दुरुस्ती संबंधी निर्णय घेण्यात येतो. जमीन मालक शेतकरी तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल करुन फेरफार नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठीचा आग्रह धरु शकतात.

फेरफार कसा नोंदवावा जाणून घ्या

कोणत्याही जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर जमिनी संबंधित सर्व माहितीची नोंद करण्यापूर्वी फेरफार वहीमध्ये सर्वप्रथम नोंदी केल्या जातात. गावदप्तरी याला गाव नमुना नं. 6 – फेरफाराची नोंदवही असे म्हटले जाते. फेरफाराची नोंदवही ही वास्तविक फेरफाराची दैनंदिनी असल्याचे समजले जाते. जमीनीबाबतच्या माहितीमध्ये म्हणजेच मालक, खरेदीदार यांची नावे जसजशी बदलतात तसतसे जमीनीच्या फेरफार नोंदवहीमध्ये त्याबद्दल बदल होत जातात. हे बदल योग्य होणे अत्यंत गरजेचे असते.

जमिनीची नोंद करण्यासाठी महत्त्वाचे कायदे

टीप: अधिकृत माहितीसाठी आणि कायदेशीर सल्ल्यासाठी कृपया संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा.

Back to Home